Breaking

हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला मारहाण

Updated: सप्टेंबर 8, 2025

By Vivek Sindhu

मोबाईलच्या ‘स्टेटस’चा वाद पेटला; तरुणाला बेदम मारहाण, तिघांविरोधात गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव : तालुक्यातील मोगरा फाटा येथील आंबेडकर चौकात रविवारी रात्री किरकोळ कारणावरून शेतकऱ्याला लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दिटुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राजाभाऊ तुंबक टोले (वय ४५, व्यवसाय शेती, रा. आनंदगाव, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता ते मोटारसायकलवर बसून मोगरा गावातील त्यांच्या मामाला भेटण्यासाठी जात होते. दरम्यान मोगरा फाटा, आंबेडकर चौक येथे आरोपी वैजनाथ कारभारी जाधव (रा. दगडी तांडा), तात्या भानुदास आलाट, साईनाथ राधाकिसन थोरात (दोन्ही रा. मोगरा) व यशवंत विठ्ठल मोरे (रा. शिवाजीनगर, मोगरा) हे रस्त्यावर थांबलेले होते. फिर्यादीने गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे आरोपींनी संगनमत करून त्यांना अडवले आणि “हॉर्न का वाजवला” असे म्हणत लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने पाठीवर, तोंडावर व पायावर मारहाण करून जखमी केले.

या प्रकरणी दिटुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सफौ वाघमारे करत आहेत.


Categories

Recent Posts