Breaking

मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Updated: ऑगस्ट 16, 2025

By Vivek Sindhu

IMG 20250816 WA0027

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : मुसळधार पावसामुळे मांजरा प्रकल्प भरभरून वाहण्याच्या स्थितीत पोहोचला असून धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज शनिवारी (१६ ऑगस्ट) दुपारी दोन वाजता धरण ९० टक्के क्षमतेने भरल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ४ दरवाजे ०.२५ मीटर उंचीने उघडले. या दरवाजांमधून ३४९४.२८ क्यूसेक्स (९८.९६ क्यूमेक्स) वेगाने पाणी विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

व्हिडीओ पहा : https://www.facebook.com/share/v/1BLivZ5BLM/

धरणात अजूनही पाण्याची मोठी आवक सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग आवश्यकतेनुसार कमी अथवा जास्त केला जाणार असल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या विसर्गामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात अजिबात प्रवेश करू नये, जनावरे, शेतीतील साधनसामग्री सुरक्षित ठिकाणी हलवावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

“नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी,” असा स्पष्ट इशारा मांजरा प्रकल्पाच्या पुरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.


Categories

Recent Posts