Breaking
Updated: मे 18, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: दुबईहून छुप्या मार्गाने आणलेले सोने बाजारभावापेक्षा स्वस्त देण्याच्या अमिषाला बळी पडलेल्या एका सोनाराला भरदिवसा लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार केज येथे घडला आहे. मात्र, म्हणतात ना ‘बुरा काम का बुरा नतीजा’, सोनाराला लुटून सुसाट पळणाऱ्या दरोडेखोरांच्या गाडीला अपघात झाला आणि नियतीने त्यांना थेट पोलिसांच्याच हवाली केले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील टाकळगव्हाण येथील व्यावसायिक दत्तात्रय रामेश्वर काकडे यांना अमोल शिंदे नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून दुबईचे सोने प्रति तोळा ५ हजार रुपयांनी स्वस्त देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला भुलून काकडे आपल्या कारागिरासह केज-बीड रस्त्यावरील साखर कारखान्यासमोरील एका शाळेजवळ पैसे घेऊन पोहोचले. तिथे आरोपींनी पिवळा धातू दाखवून काकडे यांच्या कारागिराकडील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. काकडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आणि त्यांचा मोबाईलही फोडून टाकला. दरोडेखोरांनी बॅगेतील ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल म्हणजेच ३ लाख रुपये काढून घेतले आणि बॅग फेकून पळ काढला.
काकडे यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला असता, काही अंतरावर टाकळी फाटा येथे दरोडेखोरांच्या वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांना दिसले. अपघातस्थळी आधीच पोलीस हजर होते. काकडे यांनी पाहिले असता जखमी झालेले इसम दुसरे तिसरे कोणी नसून तेच दरोडेखोर असल्याचे स्पष्ट झाले. अमोल शिंदे हे खोटे नाव सांगणाऱ्या या आरोपींची खरी नावे दशरथ उर्फ अप्पा शिवाजी शिंदे आणि विशाल रामकिशन शिंदे अशी असून ते धाराशिव जिल्ह्यातील मांडवा येथील रहिवासी आहेत. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रामराव मांजरमे या चित्रपटपटालाही लाजवणाऱ्या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.