Breaking

दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार ; तिघे जखमी

Updated: सप्टेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

तलवाड्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : तुळजापूरला घटस्थापनेसाठी ज्योत आणण्यास निघालेल्या तरुणांच्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण भाविक जागीच ठार झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना केज – कळंब रस्त्यावर मांजरा नदीवरील पुलाजवळ मांगवडगाव शिवारात रविवारी (दि. २१) रात्री घडली.

सोमवारी घटनस्थापना असल्यामुळे तुळजापुरला तुळजाभवानी मातेची ज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तरुणांच्या दोन दुचाकींची केज – कळंब रस्त्यावर मांजरा नदीवरील पुलाजवळ मांगवडगाव शिवारात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास धडक झाली. या अपघातात गोविंद शेषेराव नवले (वय २४, रा. कोठी ता. केज) या तरुण भाविकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरून जाणारे विश्वनाथ भोसले (रा. सिंगणवाडी, ता. धारूर), अविष्कार फुलचंद भांडवलकर (वय१८, रा. सोनीजवळा ता. केज) व अभिषेक नागनाथ कोल्हे (वय २५, रा. केवड ता. केज) हे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच युसूफवडगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोलिस उपनिरीक्षक मांजरे व जमादार संपत शेंडगे यांनी भेट देऊन अपघाताचा पंचनामा करून गोविंद शेषेराव नवले याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

वाहतूक अर्धा ठप्प, टिपर पलटी

केज – कळंब रस्त्यावर दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातामुळे रस्ता ब्लॉक होऊन अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. याच भरधाव वेगातील एक टिप्परही ठिकाणी पलटी झाला झाला. मात्र सुदैवाने चालकाला इजा झाली नाही.


Categories

Recent Posts