Breaking
Updated: ऑगस्ट 14, 2025
सोनवणे दाम्पत्य दिल्लीकडे रवाना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थितीत राहण्यासाठी केज तालुक्यातील मस्साजोगच्या महिला सरपंच वर्षा सोनवणे व त्यांचे यजमान आनंदराव सोनवणे या दोघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण दिले आहे.
तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांनी हे निमंत्रण खास दुताकरवी सोनवणे यांना पाठविले आहे.
मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत नाम फाउंडेशन व पाणी फाउंडेशन यांच्या वतीने ५ मे २०२४ पासून मस्साजोग परिसरातील नदी खोलीकरण, तलावातील गाळ उपसा करुन तलावाचे ही खोलीकरण केले होते.
दरम्यान पंधरा दिवसानंतरच अवकाळी पाऊस आल्यामुळे नदीच्या पात्रात व तलावातील पाण्याची पातळी वाढून मस्साजोग शिवारातील बोअर व विहिरीतील पाणी पातळीत वाढ होऊन सर्व शिवार पाणीदार झाला होता.
याची दाखल जिल्हाधिकऱ्यांनी घेवून याचा अहवाल दिल्ली येथील जसलशक्ती मंत्रालयाला देण्यात आला होता. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेवून मस्साजोग येथील महिला सरपंच वर्षा सोनवणे यांच्यासह त्यांचे यजमान आनंदराव सोनवणे यांना स्वातंत्र्य दिनी दिल्ली येथे होणाऱ्या स्वतंत्र्य दिनाच्या ध्वजारोहन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
सरपंच वर्षा सोनवणे व त्यांचे पती आनंद सोनवणे हे बुधवारी सकाळीच नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी, जाताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
नाम व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शिवारातील नदी खोलीकरण व तलावातील गाळ काढून केलेल्या तलावाच्या खोलीकरणामुळे सारा शिवार पाणीदार झाल्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रातून मस्साजोगच्या एकमेव सरपंच वर्षा सोनवणे यांना हा बहुमान मिळणार आहे. सोनवणे दांपत्याची दिल्ली येथील जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय माती आणि पदार्थ संशोधन केंद्राच्या सदनात (सीएसएमआरएस) थांबण्याची व्यवस्था केल्याची माहिती तेथील संपर्क अधिकारी रजत जांगिड यांनी दिली.