Breaking
Updated: June 19, 2025
WhatsApp Group
Join Now
कृषी विभाग व नॅचरल शुगर चा संयुक्त उपक्रम
सुधारित कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शेतीशाळा हे प्रभावी माध्यम असल्याने तसेच शेती व्यवसायामध्ये महिलांचा मोलाचा वाटा असल्याने कृषी विभागाने महिलांच्या शेतीशाळा घेण्यावर विशेष भर दिलेला आहे.
कृषी विषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि नॅचरल शुगर रांजणी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिरत्न बी. बी ठोंबरे, उपविभागीय कृषी अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी पंडित काकडे व ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी धानोरा खुर्द येथे महिलांची शेतीशाळा घेऊन मार्गदर्शन केले.
काकडे यांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, टोकन यंत्राच्या साह्याने रुंद सरी वरंब्यावर सोयाबीन टोकन करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. सिडिओ शिवप्रसाद येळकर यांनी शेतीशाळेचे महत्त्व, रससोशक किडींच्या व्यवस्थापनासाठी कमी खर्चातील चिकटसापळे तयार करणे, कामगंध सापळे, सापळा पिकांची लागवड, चुनखडी युक्त शेत जमिनीमधील ऊस पिकामधील पिवळसरपणा विकृती व्यवस्थापन, ऊस पिकामधील पोक्का बाईंग रोग व्यवस्थापन संदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
तसेच नॅचरल शुगरच्या माध्यमातून ड्रोनच्या साह्याने अनुदानित फवारणी, नॅचरल ऑरगॅनिक फर्टीलायझर उपलब्धता बाबत माहिती दिली. ग्राम महसूल अधिकारी सुहास चाटे यांनी ॲग्रीस्टॅक बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी मुंडे, सरपंच पार्वती पोळ, बेस्ट ऍग्रोचे प्रतिनिधी शिनगारे, कृषी पर्यवेक्षक स्वप्निल खोसे, तुकाराम रेड्डी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.