Breaking

वाटेने जावू देण्यास विरोध करून नवरा-बायकोला जबर मारहाण 

Updated: फेब्रुवारी 24, 2026

By Vivek Sindhu

जहारवाडीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला मारहाण; शासकीय कामात अडथळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सात जणां विरुद्ध गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- या वाटेने तुम्हाला वागू देणार नाही. असे म्हणून रस्त्याने जाण्या- 

येण्यास प्रतिबंध करून पती-पत्नीला काठी, पाईप आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वा. च्या तुकुचीवाडी ता. केज येथील सुमारास चिंगुबाई चौरे आणि त्यांचे पती आश्रूबा चौरे हे दोघे ते राहत असलेल्या शेतातील घरी जात असताना डोईफोडे वस्ती जवळ त्यांना त्यांच्या गावातील अशोक एकनाथ डोईफोडे, नामदेव एकनाथ डोईफोडे या दोघांनी अडवून आमच्या वाटेने तुम्ही तुमच्या घराकडे जायचे नाही. असे म्हणुन शिवीगाळ केली. नामदेव डोईफोडे यांने चिंगुबाई चौरे यांना काठीने पाठीवर, उजवे पायाच्या मांडीवर, मारहान करून मुकामार दिला. तसे आश्रुबा चौरे यांना देखील काठीने मारहाण केली. तसेच श्रीराम एकनाथ डोईफोडे, त्याची पत्नी स्वाती श्रीराम डोईफोडे, छकुबाई नामदेव डोईफोडे या दोघींनी डोक्याचे केस पकडुन खाली पाडले आणि लाथाबुक्यांनी मारहान केली. तसेच प्रिंयका आशोक डोईफोडे हिने गॅसच्या पाईपने मारहान केली. तर एकनाथ ज्ञानोबा डोईफोडे याने अश्रूबा चौरे यांना चापटाबुक्यांनी मारहान केली. आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

चिंगुबाई चौरे यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात आशोक एकनाथ डोईफोडे, नामदेव एकनाथ डोईफोडे, श्रीराम एकनाथ डोईफोडे, स्वाती श्रीराम डोईफोडे, छकुबाई नामदेव डोईफोडे, प्रिंयका आशोक डोईफोडे आणि एकनाथ ज्ञानोबा डोईफोडे या सात जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ८३/२०२६ भा. न्या. सं. १२६(२), १८९(२), १९१(२), ११५(२), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार पुरुषोत्तम शेप हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts