Breaking

अंबाजोगाई तालुक्यातील युवकांच्या कारचा धाराशिव जिल्ह्यात अपघात; एक ठार, पाच गंभीर जखमी

Updated: July 5, 2025

By Vivek Sindhu

Picsart 25 07 06 01 28 29 762 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील उजनी येथील सहा महाविद्यालयीन विद्यार्थी कारमधून (एमएच ४६ एपी १२१०) तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी जात असताना औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात एक युवक जागीच ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात दुपारी सुमारे १ वाजता औसा–तुळजापूर महामार्गावरील शिंदाळा (लो.) गावाजवळ घडला. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून सर्व्हिस रोडवर उलटली. या जोरदार धडकेत वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.

या दुर्घटनेत कार्तिक किरण गायकवाड (वय २२, रा. उजनी, ता. अंबाजोगाई) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर ओमकार सुदर्शन गिरी (१७, रा. उजनी), शिवम नारायण गुट्टे (२०, रा. खापरटोन), रोहन विजय कांगणे (२२, रा. कांगणेवाडी), किरण पाटलोबा कांगणे (२०, रा. कांगणेवाडी) आणि राजेश शाम भारती (१९, रा. उजनी) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.