Home »
Gevrai » गेवराईत श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे जल्लोषात स्वागत
गेवराईत श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे जल्लोषात स्वागत
श्री स्वामी समर्थांच्या जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण
गेवराई – अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या श्री स्वामी समर्थ महाराज पादुका पालखीचे मंगळवार दि.१० जुन रोजी सायंकाळी गेवराईत शहरात आगमन झाले यावेळी स्वामी भक्तांच्या वतीने वाणी मंगल कार्यालयात पालखीचे जल्लोषात स्वागत करुन अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ की जय असा जयघोष करण्यात आला. यावेळी श्रींची महाआरती व तदनंतर भाविकांनी श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
श्री स्वामी समर्थ अन्नछन्न मंडळ, अक्कलकोट द्वारा आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट पालखीचे गेवराई शहरात मंगळवार दि.१० जून २०२५ रोजी सायं ०५:३० वाजता आगमन झाले. स्वामी भक्तांनी पालखीचे जल्लोषात स्वागत करुन श्रींची महाआरती व तदनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बुधवारी पहाटे भाविकांच्या हस्ते अभिषेकानंतर पालखीचे पाथर्डीकडे प्रस्थान झाले. सेवेला संदीप राजगुरु , राजेंद्र सिकची, अविनाश कुलकर्णी, , संदीप सिकची, सुधीर जोशी, अनंता वडघणे, श्रीपाद रामदासी, गोपाल लखोटिया व श्री स्वामी समर्थ भक्तगण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Last Updated: June 12, 2025
About Author
विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.
Share This Post