Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

आष्टीत घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

Updated: सप्टेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

आष्टीत घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी : सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे समिश्र नगर भागात राहणाऱ्या ज्योती नागनाथ विटकर (वय ३४, व्यवसाय-घरकाम, रा. समिश्र नगर, आष्टी जि. बीड) यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल २ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

१६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दक्षिण बाजूच्या किचनच्या लोखंडी सेफ्टी दरवाज्याचे कुलूप तोडून व आतील लाकडी दरवाज्याचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोख रक्कम, दोन तोळ्यांची सोन्याची चैन, दोन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याच्या कानातील रिंग असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या घटनेची नोंदआष्टी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.


Categories

Recent Posts