Breaking
आष्टीः तालुक्यातील मायंबा सावरगाव येथे देवदर्शनासाठी आलेला तरुण इतर तरूणांबरोबर येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार ९ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. अंभोरा पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोकुळ सावंत गडरी (वय-२२), रा.मेहुनबार ता.चाळीसगांव, जि.जळगांव असे या तरुणाचे नाव आहे.
गोकुळ सोमवारी सकाळी आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे देवदर्शनासाठी आला होता. तो इतर तरूणांसोबत या ठिकाणी असलेल्या तलावात पोहण्यासाठी आला होता. दुपारी एकच्या सुमारास गोकुळ तळ्यामध्ये पोहण्यास उतरला. पोहताना अचानक तो पाण्यात गंटागळ्या खाऊ लागला व त्याला दम लागत असल्याने तो पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आसपासचे लोक धावून आले आणि त्यांनी गोकुळ वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र त्याचा शोध लागला नाही. घटनास्थळी आष्टी तहसिलदार वैशाली पाटील यांनी स्वतःभेट घेत पाहणी केली. याठिकाणी दुपारी ४ वाजेपर्यंत सावरगावच्या स्थानिक तरुण गोकुळ चा मृतदेह शोधत होते मात्र त्यांना यश आले नव्हते.
Last Updated: June 9, 2025
Share This Post