Breaking

केजसह तालुक्यातील मध्यम, लघु प्रकल्प मृतसाठ्यात:टंचाईच्या झळा

Updated: जून 20, 2026

By Vivek Sindhu

केजसह तालुक्यातील मध्यम, लघु प्रकल्प मृतसाठ्यात:टंचाईच्या झळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

प्रशासनाकडून सिंचन उपसा बंद करत पाणी पिण्यासाठी केले आरक्षित‎

केज – केज तालुक्यातील एका मध्यम प्रकल्पासह आठ लघु प्रकल्प व तीन साठवण तलावातील पाणी साठा मृतसाठ्यात गेले आहे. त्यामुळे सिंचन उपसा गेल्या दीड महिन्यापासून बंद असून पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आता पावसाकडे लक्ष लागले आहे.

केज तालुक्यात गतवर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने मांजरा धरणासह तालुक्यातील मध्यम, लघु प्रकल्प व साठवण तलाव ओव्हरफ्लो झाले होते. रब्बीच्या हंगामात प्रकल्पातील पाण्याचा उपसा झाला होता. तर तालुक्यातील अनेक मध्यम आणि लघु प्रकल्पावरून अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना सुरू असल्याने पाणी उपसा सुरू आहे. उन्हाळ्यात उष्णतेच्या बाष्पीभवन होऊन ही पाणी साठ्यात घट झाली होती. त्यामुळे तालुक्यातील वाघेबाभूळगाव या मध्यम प्रकल्पासह कारंजा, होळ, मुलेगाव, जानेगाव, कासारी, नाव्होली, जाधवजवळा, उंदरी, हे आठ लघु प्रकल्प, लिंबाचीवाडी क्र. १, लिंबाचीवाडी क्र. २ हे दोन साठवण तलाव मृतसाठ्याच्या खाली गेले आहेत. तर मस्साजोग लघु प्रकल्प व जिवाचीवाडी साठवण तलाव मृतसाठ्याच्या वर आहे. मागील दीड महिन्यापासून सिंचन उपसा बंद करण्यात आलेला आहे. तलावावरील पाणी उपसा करणाऱ्या मोटारी काढून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. तर पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आता पाऊस पडेपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करणे महत्वाचे असून पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरळीत राहण्यासाठी पाऊस पडणे गरजेचे आहे.

प्रकल्पातील पाणी साठ्याची आकडेवारी केज तालुक्यातील मध्यम, लघु प्रकल्पासह साठवण तलावात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याची आकडेवारी पुढील प्रमाणे- वाघेबाभूळगाव – १.०९० दलघमी, मस्साजोग : ०.३३० दलघमी, कारंजा – ०.१९३ दलघमी, होळ – ०.०१३ दलघमी, मुलेगाव – ०.०१० दलघमी, जानेगाव – ०.१५८ दलघमी, कासारी – ०.०४७ दलघमी, नाव्होली – ०.०८० दलघमी, जाधवजवळा – ०६६५ दलघमी, उंदरी – ०.८२७ दलघमी, जिवाचीवाडी – ०३६५ दलघमी, लिंबाचीवाडी क्र. १ – ०.२५७ दलघमी, लिंबाचीवाडी क्र. २ – ०.१३२ दलघमी इतका पाणी साठा आहे. अशी माहिती केजच्या जलसिंचन शाखेचे संजय वाघमारे यांनी दिली.


Categories

Recent Posts