Breaking

जमिनीच्या हिशोबावरून वृद्धाला बेदम मारहाण; आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील घटना

Updated: जून 19, 2026

By Vivek Sindhu

जमिनीच्या हिशोबावरून वृद्धाला बेदम मारहाण; आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: तालुक्यातील केळसांगवी बोराडेवस्ती येथे जमिनीच्या वाटणीच्या हिशोबावरून झालेल्या वादात एका ६६ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत वृद्धाचा पुढचा दात तुटला असून, आष्टी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कान्हु बोराडे यांनी आपली जमीन आरोपी विलास नवनाथ राजगुरु याला वाट्याने दिली होती. ५ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बोराडे यांनी आपल्या शेतात आरोपीला या जमिनीच्या उत्पन्नाचा हिशोब मागितला. याचा राग आल्याने आरोपीने बोराडे यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बोराडे यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केला असता, संतप्त झालेल्या आरोपी विलास राजगुरु याने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत बोराडे यांच्या तोंडाला दुखापत होऊन त्यांचा समोरचा एक दात तुटला. या घटनेनंतर पीडित वृद्धाने आष्टी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७ (२), ११५ (२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार घाडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts