Breaking

दारू पिऊन शिवीगाळ करण्यास जाब विचारल्याने मजुराला कोयत्याने बेदम मारहाण

Updated: जून 10, 2026

By Vivek Sindhu

दारू पिऊन शिवीगाळ करण्यास जाब विचारल्याने मजुराला कोयत्याने बेदम मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: तालुक्यातील वाघेबाभुळगाव येथे दारूच्या नशेत एका व्यक्तीला शिवीगाळ करण्यापासून रोखल्याचा राग अनावर झाल्याने, एका इसमाने मजुराला कोयत्याने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मजुराच्या डाव्या हाताचे हाड फॅक्चर झाले असून, आरोपीने घराचेही मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचे वाघेबाभुळगाव येथील रहिवासी असलेले आणि सध्या मुंबईत मजुरी करणारे श्रीकांत रावसाहेब जाधव हे गावाकडे आले असता, ३ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. गावातील पांडू सुभराव जाधव हा दारू पिऊन श्रीकांत यांच्या भावाला विनाकारण शिवीगाळ करत होता. श्रीकांत यांनी त्याला शिव्या देण्यामागचे कारण विचारले असता, संतप्त झालेल्या पांडूने हातातील तीक्ष्ण कोयत्याने श्रीकांत यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर जोरदार प्रहार केला. या भीषण हल्ल्यामुळे श्रीकांत यांच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. आरोपीने एवढ्यावरच न थांबता त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि घराच्या छतावर चढून कोयत्याने पत्रा तोडून नुकसान केले. सुरुवातीला उपचाराला प्राधान्य दिल्यानंतर ९ जून रोजी रात्री श्रीकांत यांनी पोलिसात तक्रार दिल्याने याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार वंजारे पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts