Breaking

घरगुती वादातून पत्नीला दगडाने मारहाण; शिरुर कासार येथील धक्कादायक घटना

Updated: जून 10, 2026

By Vivek Sindhu

घरगुती वादातून पत्नीला दगडाने मारहाण; शिरुर कासार येथील धक्कादायक घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरुर कासार: येथील सोनार गल्ली परिसरात दारुड्या पतीने आपल्या पत्नीला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. याप्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बावी येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय वैष्णवी पप्पू खरमाटे या मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्या वैद्यकीय उपचारासाठी शिरुर कासार येथील सोनार गल्ली भागात आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पती पप्पू राजेंद्र खरमाटे तिथे अचानक पाठीमागून आला. त्याने वैष्णवी यांना घरी परत येण्याबाबत विचारणा केली. त्यावर वैष्णवी यांनी पतीच्या दारू पिण्याच्या त्रासाला कंटाळून घरी येण्यास नकार दिला. या नकाराचा राग अनावर झाल्याने आरोपीने जाहीर ठिकाणी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपीने वैष्णवी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवरील दगड उचलून थेट त्यांच्या डोक्यात मारला. या प्राणघातक हल्ल्यात वैष्णवी यांचे डोके फुटून रक्तस्त्राव झाला. आरोपीने पत्नीसह तिच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर वैष्णवी यांनी पोलिसात धाव घेतली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार सुरवसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts