Breaking
Updated: जून 10, 2026
ऊस तोड मुकादमाने वाहतूकदाराची साडेतेरा लाखाला फसवणूक केली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – ऊसतोड मजूर न पुरविता ऊस वाहतुकदाराची टोळी मुकादमाने १३ लाख ४८ हजार रुपये हडप करून फसवणूक केली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात टोळी मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
होळ ता. केज येथील भीमराव उत्तमराव घुगे हे कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील बालाजी शुगर फॅक्टरीस ट्रॅक्टरने ऊस वाहतूक करतात. या साखर कारखान्यास ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी त्यांनी कल्याण बापूराव मुंडे (रा. ताडसोन्ना जि. बीड) या टोळी मुकादमासोबत करार करीत १६ कोयते (३२ मजूर) देण्याचे ठरवून १५ लाख रुपये दिले. मात्र कल्याण मुंडे याने सहा कोयते पुरविले. तर हे सहा कोयते ही मध्येच काम सोडून पळून गेले. या कोयत्यांनी केवळ १ लाख ५२ हजार रुपयांचे काम केले. त्याच्याकडे १३ लाख ४८ हजार रुपये फिरल्याने भीमराव घुगे यांनी टोळी मुकादम कल्याण मुंडे यास वारंवार पैशाची मागणी केली. मात्र त्याने पैसे ही देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली. अशी तक्रार भीमराव घुगे यांनी दिल्यावरून टोळी मुकादम कल्याण मुंडे विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अमजद सय्यद हे तपास करीत आहेत.