Breaking
Updated: जून 10, 2026
उमरीतून टॉवरचे २५ हजाराचे केबल चोरले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – जिवाचीवाडी (ता. केज) हे माहेर असलेल्या भाग्यश्री रामहरी वडणे (वय २८) या विवाहितेचा विवाह २९ डिसेंबर २०१५ रोजी कुंजीरवाडी (जि. पुणे) येथील रामहरी महादेव वडणे याच्या सोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या असून त्या १० व ७ वर्षाच्या आहेत. दोन वर्षे चांगले नांदविल्यानंतर तिचे पतीचे बाहेरील मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्या मुलीला घरी घेऊन येत असल्याने तिने पतीला विचारणा केली. मात्र तिच्या पतीने तिला तू घर चालव, ती मला पैसे देते. तुला दोन मुली आहेत, मुलगा नाही. तुला राहायच नसेल तर निघुन जा असे म्हणत सतत भांडण व मारहाण करीत छळ केला. खर्चाला पैसे मागितले, तर आई वडिलांकडून घेऊन म्हणत पैसे दिले नाहीत. तर सासू, सासरे व नणंदने भांडण करून घराबाहेर हाकलून दिले. भाग्यश्री हिने माहेरी येऊन महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली. मात्र त्यांच्यात तडजोड न झाल्याने भाग्यश्री वडणे हिने दिलेल्या तक्रारीवरून पती रामहरी वडणे, सासू तारामती वडणे, सासरे महादेव वडणे, नणंद कावेरी गायकवाड या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार हनुमान मुंडे हे तपास करताहेत.