Breaking

परळीत अवैध गुटख्यावर कारवाई

Updated: जून 5, 2026

By Vivek Sindhu

परळीत अवैध गुटख्यावर कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी – शहरात अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना मिळताच गुरुवार (दि.४)रोजी रात्री कारवाई करत ६ लाख २४,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकास ताब्यास घेण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरु केला असून परळी शहरात विमल पान मसाला,तसेच विविध कंपनीचा गुटखा मारुती सुझुकी क्रमांक एमएच १२ जेयु ७९५२ या कार मधून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना मिळताच गुरुवार (दि.४)रोजी रात्री कारवाई करत १ लाख २४ हजार रुपयांचा गुटखा व ५ लाख रुपयांची कार असा एकूण ६ लाख २४,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीसचिन आनंदराव धर्माधिकारी (वय ४२) रा.बजाज नगर औरंगाबाद ह.मू.आम्लेश्वर नगर लातूर याच्यावर पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी येथे गुन्हा 140 /2026 कलम 123,124,273,274 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक चेतना तिडके,सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, ASI नागरगोजे पो.ह साजीद पठाण.पो.अ .श्री.घुगे,श्रीकुरे यांनी केली आहे.


Categories

Recent Posts