Breaking

अभिजित सुगावकर “रोटरी सक्षम” तर निवृत्ती तोडकर “रोटरी आत्मनिर्भर” पुरस्काराने सन्मानित

Updated: मे 30, 2026

By Vivek Sindhu

अभिजित सुगावकर "रोटरी सक्षम" तर निवृत्ती तोडकर "रोटरी आत्मनिर्भर" पुरस्काराने सन्मानित

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई -: दिव्यांगत्वावर मात करत समाजात सक्षमपणे कार्यरत असलेले वैद्यनाथ बँकेचे व्यवस्थापक अभिजित सुगावकर यांना “रोटरी सक्षम” तर प्रयोगशील शेतकरी निवृत्ती तोडकर यांना रोटरी आत्मनिर्भर पुरस्काराने शाल,श्रीफळ, व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने आई फंगशन हॉल येथे वोकेशनल सर्व्हिस अवॉर्ड या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे प्रांतपाल सुधीर लातुरे, उप प्रांतपाल प्रवीण देशपांडे, रोटरीच्या अध्यक्षा रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी, संगीता लातुरे, यांच्या हस्ते अभिजित सुगावकर व निवृत्ती तोडकर यांना सन्मानित करण्यात आले.
अभिजित सुगावकर हे दिव्यगत्वावर मात करून गेल्या २५ वर्षांपासून वैद्यनाथ बँकेत ग्राहकांना सेवा देत आहेत. तर तोडकर यांनी आपल्या शेतीत गायगोठा,दूध उत्पादन, पशुखाद्य असे प्रकल्प ग्रामीण भागात सुरू केले. व आत्मनिर्भर शेतकरी कसा असावा. याचा प्रेरणादाई आदर्श समोर ठेवला.असे सुधीर लातुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी पाठक यांनी केले.संचलन डॉ.प्रिया नागरगोजे यांनी तर उपस्थितांचे आभार वसुधा गडसिंग यांनी मानले.या कार्यक्रमास महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts