Breaking

कॉ.पिनराई प्रकरणी माकपची जिल्हाभर निदर्शने

Updated: मे 29, 2026

By Vivek Sindhu

कॉ.पिनराई प्रकरणी माकपची जिल्हाभर निदर्शने

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – केरळचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी राजकीय सूड भावनेतून ईडीच्या कारवाई करण्यात येत असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून संशय व्यक्त केला जात असून या कारवाईचा निषेधार्थ शुक्रवार दि 29 रोजी माकप कडून जिल्ह्याभर निदर्शने करण्यात आली.

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी टाकलेली धाड ही राजकीय सूडबुद्धीने प्रेरित कारवाई आहे. कारण न्यायालयांनी वारंवार स्पष्ट केले आहे की पिनराई विजयन यांचा एक्सालॉजिक प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, तरीही त्यांच्या विरोधातील राजकीय छळ मोहीम अखंड सुरू आहे. केरळचे काँग्रेसचे नवीन मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या दिल्लीतील पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर लगेचच अशी कारवाई होणे गंभीर प्रश्न निर्माण करणारे असून हे राजकीयरीत्या रचलेले नाट्य असल्याचे माकप कडून सांगण्यात येत आहे. सीएमआरएल डायरीत ज्यांची नावे असल्याचे सांगितले जाते, असे अनेक जण आजही राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर आहेत. मात्र त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ पिनराई विजयन यांनाच सातत्याने लक्ष्य केले जात असल्याने या कारवाईमागील राजकीय सूडबुद्धी अधिक स्पष्ट होते.

कोणत्याही चौकशी प्रक्रियेत अडथळा आणण्याचा आमच्या पक्षाचा कोणताही हेतू नाही असे सांगत राजकीय लक्ष्य साधण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा उघड गैरवापर सहन केला जाणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून केंद्रात सत्तेत असलेले भाजप सरकार जनतेच्या लोकशाही हक्कांवर हल्ला करत असल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बीड च्या वतीने शुक्रवार दि 29 रोजी परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, सिरसाळा या ठिकाणी निदर्शने करण्यात आली असून या प्रसंगी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह सर्व पुरोगामी पक्ष, संघटना यांचे नेते, कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.