Breaking

आंदोलनाचा इशारा देताच कारखानदार सजग

Updated: मे 18, 2026

By Vivek Sindhu

आंदोलनाचा इशारा देताच कारखानदार सजग

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

महिण्याखेर प्रलंबित देयक अदा करण्याचे अभिवचन

बीड – जिल्ह्यातील अनेक ऊस कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. वास्तविक पाहता पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना ही ऊसाची रक्कम मिळणे अनिवार्य असताना ऊस कारखाना व्यवस्थापनाने अजून ही रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त असून सनदशीर मार्गाने हा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करत असून सायखेडा येथील 21 शुगर्स कारखान्याकडून प्रलंबित असलेल्या ऊस देयकप्रश्नी सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा देताच कारखाना प्रशासनाने या महिण्याखेर प्रलंबित सर्व ऊस देयक घोषित केलेल्या दराप्रमाणे अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले.

बीड जिल्ह्यातील तसेच जिल्हयाच्या सीमेवर असलेल्या परभणी जिल्ह्यातील सायखेडा येथील 21 शुगर्स साखर कारखान्याने जिल्हयातील सीमावर्ती भागातील असंख्य शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाला नेला. कायद्यानुसार ऊस गाळप पश्चात्य 15 दिवसात कारखाना प्रशासनाने ऊस देयक अदा करणे बंधनकारक असताना देखील असंख्य शेतकऱ्यांची मागील चार महिन्यापासून कोट्यावधीची रक्कम साखर कारखानदाराने अद्याप ही शेतकऱ्यांना अदा केलेली नाही. प्रलंबित ऊस देयक अदा करण्यात यावेत याकरिता अखिल भारतीय किसान सभा, ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मार्फत वेळोवेळी निवेदने, आंदोलने करण्यात आली मात्र साखर कारखानदाराकडून देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकरी आक्रमक होत सोमवार दि 18 पासून साखर कारखान्यावर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा देताच कारखाना प्रशासनाने आंदोलनकर्त्याना 31 मे अखेर प्रलंबित सर्व शेतकऱ्यांची ऊस देयक अदा करण्यात येतील असे लेखी अभिवचन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या प्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे ऑड.अजय बुरांडे यांच्यासह मुरलीधर नागरगोजे, ऋषिकेश जोगदंड, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जाधव विश्वाबर जोगदंड, शिवाजी कदम, श्रीराम बडे, सरपंच रघुनाथ देशमुख, ऑड.श्रीनिवास मुंडे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.


Categories

Recent Posts