Breaking
Updated: मे 18, 2026
जीप आडवी आल्याने टमटम धडकले ; तिघे जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज -रस्त्याच्या कडेला उभी जीप अचानक आडवी घेतल्याने टमटम जीपला धडकल्याने या अपघातात टमटममधील तिघे जखमी झाल्याची घटना केज – कळंब रस्त्यावरील पेट्रोलपंपासमोर घडली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला पाठविण्यात आले आहे.
केजहुन गणेश वासुदेव कोळी, रसूल गुलाब शेख, चाँद शेख हे तिघे रविवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास टमटमने कळंबला निघाले होते. टमटम हे केज – कळंब रस्त्यावरील कमल पेट्रोलसमोर आले होते. याचवेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली जीप (एम. एच. ४४ एई ७४७८) अचानक चालकाने पेट्रोल पंपाकडे वळवीत आडवी केल्याने टमटम जीपला धडकले. या झालेल्या अपघातात गणेश वासुदेव कोळी, रसूल गुलाब शेख, चाँद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जीप चालक व जीपमधील लोक पसार झाले. या जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मार जास्त लागल्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.