Breaking
Updated: एप्रिल 29, 2026
तरुणाला घराबाहेर ओढून बेदम मारहाण; जिवे मारण्याची धमकी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: नाळवंडी परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या भावाला घराबाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मसु लहु जाधव वय २८ वर्षे, व्यवसाय समाजकार्य याने याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचा भाऊ मारहाण झालेल्या एका नातेवाईकाची विचारपूस करण्यासाठी गेले असता आरोपींनी हा हल्ला केला. आरोपी बाबासाहेब जाधव, समाधान जाधव, सुहास जाधव, सम्राट जाधव, जानु जाधव, संग्राम जाधव आणि सोहन जाधव यांनी संगनमत करून फिर्यादीला ‘तुम्ही येथे कशाला आलात’ असे विचारत शिवीगाळ केली.
आरोपींनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देऊन ‘हत्यार काढा, यांना संपवा नाहीतर गोळ्या घाला’ असे चिथावणीखोर वक्तव्य केले. या हल्ल्यात फिर्यादीच्या मोटारसायकलचे इंडिकेटर आणि खोपडी फोडून अंदाजे १०,००० रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच, पोलिसांत तक्रार दिल्यास हातपाय तोडून टाकण्याची धमकीही आरोपींनी दिली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात या सातही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.