Breaking

आष्टी तालुक्यात सौरपंप चोरट्यांचा सुळसुळाट; पांढरी शिवारातून मोटार संच लंपास

Updated: एप्रिल 29, 2026

By Vivek Sindhu

आष्टी तालुक्यात सौरपंप चोरट्यांचा सुळसुळाट; पांढरी शिवारातून मोटार संच लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: आष्टी तालुक्यातील पांढरी शिवारात शेतकऱ्याच्या शेतातील सौरपंप मोटार संच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. संतोष बबन शेळके वय ४२ वर्षे या शेतकऱ्याने याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २७ एप्रिलच्या रात्री ही चोरी झाली आहे.

चोरट्याने शेतात बसवलेला सौरपंप मोटार संच चोरून नेला असून त्याची किंमत ४४,९२९ रुपये आहे. महावितरणच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या या पंपाचा बेनिफिशरी आयडी पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. आष्टी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार तादळे पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts