Breaking

सेवानिवृत्त डॉक्टरला लोखंडी गजाने बेदम मारहाण; जागेच्या वादातून हल्ला

Updated: एप्रिल 29, 2026

By Vivek Sindhu

सेवानिवृत्त डॉक्टरला लोखंडी गजाने बेदम मारहाण; जागेच्या वादातून हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: परळी शहरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त डॉक्टरवर लोखंडी गजाने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. राजकुमार शंकरराव जाधव वय ५६ वर्षे या सेवानिवृत्त डॉक्टरने परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्या जागेत बांधकाम का करता असे विचारल्याने हा वाद उफाळून आला.

आरोपी सुरेश जाधव, गिता जाधव आणि गुत्तेदार मुजा शेख यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपींनी लोखंडी गजाने डॉक्टरच्या पाठीत, डोक्यावर आणि डोळ्यांजवळ मारून गंभीर जखमी केले. अंमळनेर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार दाराडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts