Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाई तालुका माहेश्वरी सभेच्या आगामी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी पुरुषोत्तम रांदड आणि सचिवपदी ईश्वर लोहिया यांची रविवारी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, बीड जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तोष्णीवाल आणि जिल्हा सचिव जगदीश जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली. समाजाच्या संघटन वाढीसाठी आणि सामाजिक कार्याला गती देण्यासाठी ही नवी फळी सज्ज झाली आहे.
या नवीन कार्यकारिणीत अन्य महत्त्वाच्या पदांचीही घोषणा करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून जगदीश रामप्रसाद जाजू आणि प्रवीण बजाज यांची निवड झाली असून रामानुज मुंदडा यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच पवन तापडिया आणि घाटनांदूरचे संतोष सारडा यांची सहसचिव म्हणून, मुन्ना सोमाणी यांची संघटनमंत्री म्हणून आणि संजय रामविलास लोहिया यांची प्रसार मंत्री म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. ही संपूर्ण निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
ललित बजाज आणि संतोष भंडारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या संपूर्ण प्रक्रियेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे पाहिले. निवडीची घोषणा होताच जुन्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून पदभार सोपवला. या प्रसंगी पत्रकार प्रशांत बर्दापूरकर, रवी मठपती यांच्यासह प्रवीण जायभाय, स्वप्निल लोहिया, राहुल तापडिया, सचिन बजाज, संकेत लड्डा आणि चंद्रकांत पाटील यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्का