Breaking

जाब विचारणाऱ्या व्यक्तीला चाकूने भोसकले आणि चावा घेतला

Updated: एप्रिल 11, 2026

By Vivek Sindhu

जाब विचारणाऱ्या व्यक्तीला चाकूने भोसकले आणि चावा घेतला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: पेठ बीड परिसरात एका अठरा वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत हिंसक कृत्य करत एका व्यक्तीच्या छातीवर चाकूने वार केल्याची घटना सात मार्च रोजी घडली. पित्याला शिवीगाळ का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या मानेला आणि हाताला या आरोपीने दाताने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे.

या प्रकरणी पेठ बीड पोलिसांनी दहा एप्रिल रोजी महेश आदिनाथ फसले या आरोपीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल मनजाई समोर दारू पीत बसलेल्या आरोपीला फिर्यादीने वडिलांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले. यावर संतप्त झालेल्या आरोपीने त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने छातीवर वार केले. याशिवाय आरोपीने जिवे मारण्याची धमकी देत हिंसक पद्धतीने चावा घेतला.


Categories

Recent Posts