Breaking
Updated: एप्रिल 3, 2026
चोराणारी महिला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelचोरीला गेलेले मिनी गंठण पोलिसांनी केले जप्त
गौतम बचुटे/केज :- मुलीला भेटायला लातूरला जात असलेल्या एका महिलेचा गळ्यातील मिनी गंठण केज येथील बस स्टँडवरून चोरीला गेले होते. त्यातील संशयित महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
दि. १९ मार्च रोजी दुपारी केज शहरातील मंजुश्री जगदाळे या लातूर येथील शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटायला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर थांबलेल्या असताना अज्ञात महिला चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडून घेऊन फरार झाली होती.
या प्रकरणी मंजुश्री जगदाळे यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं . १६९/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार दाखल झालेला आहे.
या प्रकरणी पोलिस या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजेस तपासून त्या गंठण चोराचा तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक अनोळखी महिला मंजुश्री जगदाळे यांच्या माठीमागे उभी असल्याचे दिसत होती. तसेच ती बसमध्ये न चढता नंतर तेथून निघून घेतल्याचे आढळून आले होते.
दरम्यान, या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथकाने घटनास्थळाला भेट दिली. बस स्टँड परिसरातील सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या माहिती वरुन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय पद्धतीने माहिती काढली. त्या माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस हवालदार महेश जोगदंड, पोलिस हवालदार जफर पठाण, पोलिस हवालदार दिलीप गित्ते, महिला पोलिस हवालदार स्वाती मुंडे, वाहन चालक गणेश मराडे यांनी संशयित महिलेला बीड येथील माऊली नगर भागातून ताब्यात घेतले. तिने केज येथून चोरलेले मिनी गंठण देखील तिच्या ताब्यातून हस्तगत करून तिला केज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.