Breaking
Updated: मार्च 14, 2026
दोन नराधमांविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील अकोला येथे ऊस कारखान्यावर लवकर का घेत नाही आणि माझ्या सांगण्याप्रमाणे नोंदी का करत नाही, या कारणावरून एका कृषी साहाय्यकावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात कृषी साहाय्यक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद कैलास आगळे हे मागील दोन वर्षांपासून लातूर येथील २१ शुगर लिमिटेड मळवटी साखर कारखान्यात शेतकी विभागात कृषी साहाय्यक म्हणून खाजगी नोकरी करतात. गुरुवारी, १२ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास विनोद हे त्यांच्या घरी पत्नी हर्षदा आणि आई कान्होपात्रा यांच्यासोबत असताना, गावातीलच भावकीतील बाळासाहेब बब्रुवान आगळे हा त्यांच्या घरी आला. त्याने विनोद यांना ‘तू माझा ऊस कारखान्यावर लवकर का घेत नाहीस आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे नोंदी का घेत नाहीस’ असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन बाळासाहेब याने हातातील कोयत्याने विनोद यांच्या कपाळावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
यावेळी विनोद यांनी वाचवा वाचवा असा आरडाओरडा केल्याने त्यांची पत्नी, आई आणि मावसभाऊ बाळासाहेब बाबुराव आगळे हे सोडवा-सोडव करण्यासाठी धावून आले. मध्यस्थी करणाऱ्या हर्षदा यांनाही आरोपीने धक्काबुक्की केली आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. जखमी विनोद यांना तातडीने अंबाजोगाई येथीलसरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपी बाळासाहेब बब्रुवान आगळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ११८(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप करत आहेत.