Breaking

प्रा. ममता राठी जळीत प्रकरणाला पुन्हा कलाटणी, घातपाताचा संशय व्यक्त करत सासऱ्याची पोलिसांत तक्रार

Updated: जानेवारी 10, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 01 10 at 9.07.09 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील नामांकीत महाविद्यालयातील प्राध्यापिका ममता शामसुंदर जाखोटिया (राठी) या ७० ते ८० टक्के भाजल्याची धक्कादायक घटना ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास घडली होती. आग अचानक लागली आणि त्यात मी भाजले, माझी कोणाविरोधातही तक्रार नसल्याचा जबाब प्रा. राठी यांनी स्वतः पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र, या प्रकरणात आता एक नवीन वळण आले असून, ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय ममता यांचे सासरे दिलीप बन्सीलाल जाखोटिया यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात सखोल चौकशीची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे.

दिलीप जाखोटिया यांच्या अर्जानुसार, ममता जाखोटिया गेल्या १५ वर्षांपासून अंबाजोगाई येथे अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. ४ जानेवारी रोजी दुपारी त्यांनी पती शामसुंदर यांना फोन करून आपण भाजल्याचे आणि उपचारासाठी धनराज आर्य नामक व्यक्तीसोबत लातूरला येत असल्याचे सांगितले. लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या ७० ते ८० टक्के भाजल्याचे सांगितले.

ममता यांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सहकारी प्राध्यापक धनराज आर्य हे मानसिक तणावामुळे आत्महत्या करायला गेले होते. त्यांना वाचवण्यासाठी ममता तिथे गेल्या असता, त्यांच्यात झालेल्या वादावादीत धनराज यांच्या हातातील डिझेल ममता यांच्या अंगावर पडले आणि त्यांना आग लागली. मात्र, ही सर्व माहिती बनावट असून हा प्रकार संशयास्पद असल्याचा दावा त्यांच्या सासऱ्यांनी केला आहे.

पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी दिलीप जाखोटिया यांनी अर्जात नमूद केले आहे की, ममता यांना कोणी धमकावले आहे का किंवा यामागे काही घातपात आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी पुरावा म्हणून धनराज आर्य आणि ममता यांच्यातील व्हॉट्सॲप कॉल्सचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे सादर केले आहेत. मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स (सीडीआर) तपासून या प्रकरणाचा छडा लावावा आणि आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. या अर्जाच्या प्रती पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रा. ममता राठी यांच्यावर उपचार सुरुअसून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. 


Categories

Recent Posts