Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेत आता शेतकऱ्यांचा सहभाग; समितीत पाच प्रगतशील शेतकऱ्यांची वर्णी लागणार

Updated: जानेवारी 8, 2026

By Vivek Sindhu

मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेत आता शेतकऱ्यांचा सहभाग; समितीत पाच प्रगतशील शेतकऱ्यांची वर्णी लागणार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी आणि या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत आता पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज ८ जानेवारी रोजी जारी करण्यात आला असून यामुळे योजनेच्या नियोजनात थेट शेतकऱ्यांचा सहभाग वाढणार आहे.

या नवीन निर्णयानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्र स्तरावर एक समिती असेल ज्यामध्ये महसूल मंत्र्यांकडून नियुक्त केलेला एक सहअध्यक्ष असेल. उपविभागीय अधिकारी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून प्रगतशील शेतकऱ्यांची नावे मागवतील आणि त्यातील योग्य पाच नावांची निवड करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम मान्यतेनंतर ही समिती कार्यान्वित होईल. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत होणार असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या सल्ल्याने कामे मार्गी लागतील असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.


Categories

Recent Posts