Breaking

३०० रुपयांसाठी तरुणाला बेदम मारहाण; डोक्यात बिअरची बाटली फोडली

Updated: डिसेंबर 17, 2025

By Vivek Sindhu

३०० रुपयांसाठी तरुणाला बेदम मारहाण; डोक्यात बिअरची बाटली फोडली

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: दारू पिण्यासाठी ३०० रुपये न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे, तर डोक्यात रिकामी बिअरची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना आष्टी शहरातील राजधानी हॉटेल येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी अहमद शाहेद शेख (३६, रा. आझादनगर, आष्टी) हे हॉटेलवर असताना आरोपी अझहर एजाज शेख (रा. आझादनगर, आष्टी) याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी ३०० रुपयांची मागणी केली. अहमद यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर अझहरने त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, तिथे पडलेली रिकामी बिअरची बाटली उचलून अहमद यांच्या डोक्यात फोडली, ज्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. आरोपीने जाताना जीवे मारण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी अहमद शेख यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी अझहर एजाज शेख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तागड करीत आहेत.


Categories

Recent Posts