Breaking
Updated: डिसेंबर 17, 2025
आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: येथील थर्मल पॉवर स्टेशनमध्ये सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून स्क्रॅप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कूलिंग टॉवर ते मॅटकॉन टॉवरच्या दरम्यान चोरी करताना एकाला पकडण्यात आले, तर त्याचे चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
नितीन नेमीचंद राठोड (३४, सुपरवायझर, एमएसएफ) यांनी परळी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. १६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वैभव महादेव मोठे (रा. आंबेडकर नगर, परळी) हा आरोपी त्याच्या इतर चार साथीदारांसह संगनमत करून थर्मल पॉवर स्टेशनमधील स्क्रॅप साहित्याची चोरी करत होता. सुरक्षा रक्षकांनी वैभव मोठे याला रंगेहाथ पकडले, मात्र त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार रोटेवाड पुढील तपास करीत आहेत.