Breaking
Updated: नोव्हेंबर 9, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या (घातपाताच्या संशयास्पद) घटनेनंतर, वंजारी सोशल मीडिया वॉट्सॲप ग्रुपच्या वतीने शनिवारी (दि.08) मुंडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले असून, घातपाताचा संशय व्यक्त करत विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.
सांत्वनपर भेट आणि मदत
वंजारी घर परिवार वॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी आज डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. यावेळी त्यांनी घटनेची सविस्तर माहिती कुटुंबियांकडून जाणून घेतली. ग्रुपच्या वतीने डॉ. मुंडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. आर्थिक मदतीचा धनादेश डॉ. दिवंगत संपदा मुंडे यांचे बंधू ऋषिकेश मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी
यावेळी उपस्थितांनी मुंडे कुटुंबियांच्या सर्व सुखदुःखात सहभागी राहण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर, या प्रकरणातील जे दोषी असतील, त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक शासन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणेश दराडे, गणेश मुंडे, वशिष्ठ डोईफोडे, अजय केंद्रे, विधिज्ञ सुनील कराड, मनोज मुंडे, विकास बांगर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.