Breaking
Updated: ऑक्टोबर 17, 2025
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे निधन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelराहुरी (अहिल्यानगर) – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले (वय ६६) यांचं अल्पशा आजारानंतर आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कर्डीले हे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असून त्यांनी राज्यमंत्रीपदाचाही कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या निधनाने राहुरीसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत या निधनाची माहिती दिली आणि श्रद्धांजली व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्डीले यांच्या निधनामुळे तळागाळातील नेतृत्व हरपले. त्यांनी राहुरी मतदारसंघ व अहिल्यानगरच्या विकासासाठी अखेरपर्यंत झटले.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रद्धांजली अर्पण करत म्हटलं, “ते लोकाभिमुख, संवेदनशील व जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी सज्ज राहिले. त्यांच्या जाण्याने अहिल्यानगर जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे.”
कर्डीले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होत. त्यांच्या निधनामुळे कर्डीले आणि जगताप कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.