Breaking

बीडच्या तरुणाची सोलापूरात गोळी झाडून घेत आत्महत्या

Updated: सप्टेंबर 9, 2025

By Vivek Sindhu

स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सोलापूर : बार्शी तालुक्यातील सासुरे येथे रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रहिवासी गोविंद जगन्नाथ बर्गे या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विवाहबाह्य संबंधातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

आज सकाळपासून सासुरे शिवारात काळ्या रंगाची चारचाकी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना कारमधून गोविंद बर्गे मृतावस्थेत आढळले. गाडीतूनच एक पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्यातूनच त्यांनी गोळी झाडून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून आत्महत्येचे नेमके कारण काय याचा तपास सुरु आहे. गोविंद बर्गे यांनी खरोखरच स्वतःवर गोळी झाडून घेतली की अन्य काही घडले याबाबतचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.


Categories

Recent Posts