Breaking
Updated: सप्टेंबर 4, 2025
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) ची निवेदनाद्वारे मागणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- परळीच्या रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी एस.सी.समाजाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराणे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून नराधमास फाशीची शिक्षा द्या, पिडीत कुटुंबाचे पुनर्वसन करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांच्यासह शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मंगळवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री पंढरपूरहून परळी येथे कामाच्या शोधात आलेले एक मागासवर्गीय समाजाचे कुटूंब परळी रेल्वे स्टेशन परिसरात झोपले असता त्या कुटुंबातील एका लहान मुलीला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर केला आहे. पिडीत मुलगी ही स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालय, अंबाजोगाई येथे उपचार घेत आहे. परळी रेल्वे स्टेशनवर ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री जे रेल्वे पोलीस ड्यूटीवर होते. तसेच परळी संभाजीनगर पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी ड्यूटीवर होते त्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे सदरील घटना घडली आहे. बीड जिल्हामध्ये प्रमुख्याने परळी पोलीस आपल्या कर्तव्यात कसूर करीत आसल्यामुळे परळी शहरामध्ये गुन्हेगार लोकांवर पोलीसांचा म्हणावा तेवढा वचक राहीला नाही. परळी पोलीस अन्यत्र गुंतलेले असल्यामुळे रात्री दिलेल्या ड्यूट्या ते सक्षमपणे बजावत नसल्यामुळे एस.सी.समाजाच्या गरीब कुटुंबावर अशी बिकट वेळ आली आहे. जे पोलीस रात्री ड्यूटीवर असताना चिमुरडीवर अत्याचार झाला त्या गुन्हात पोलीसांना ही सहआरोपी करा तसेच पिडीत कुटूंबाचे पुनर्वसन करून शासकिय सेवेत समाविष्ट करा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर निवेदक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे, जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, मराठवाडा विभागीय प्रवक्ता धिमंत राष्ट्रपाल, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष बादल तरकसे, गणेश उपाडे, रवि आवाडे, सुरज शिंदे, सोमनाथ कांबळे, अंकुश कांबळे व प्रथमेश शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.