Breaking
Updated: ऑगस्ट 30, 2025
नेकनूरात दोन बिअर बार फोडून ५२ हजारांचा मुद्देमाल लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी : तालुक्यातील वडवणी बसस्थानकावर एका प्रवाशाने जबरदस्तीने अवजड लोखंडी पाईप आणि कोठ्या घेऊन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एस.टी. कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत गोंधळ घातल्याची घटना घडली. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटीचे वाहक परमेश्वर लक्ष्मण साखरे यांच्या फिर्यादीनुसार, २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता बीड-पाथरी बस (क्रमांक MH-14 MH-1967) वडवणी बसस्थानकात पोहोचली. या वेळी प्रवासी उतरत-चढत असताना गणेश हनुमंत मंके (रा. बाहेगव्हाण, ता. वडवणी) हा प्रवासी सात-आठ लोखंडी पाईप व चार मोठ्या-लहान कोठ्या घेऊन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागला.
यावेळी साखरे यांनी त्याला अवजड सामानामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका होईल व बसचे नुकसान होईल म्हणून अडवले. मात्र, त्याने जबरदस्ती बसमध्ये सामानासह चढून गोंधळ घातला. या प्रवाशाने मोठमोठ्याने आरडाओरडा करत वाहक आणि चालक अमोल दहे (रा. मानवत, जि. परभणी) यांच्याशी हुज्जत केली.
प्रवाशांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरीही तो थांबला नाही. परिणामी बस थांबवून वाहकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी गणेश हनुमंत मंके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.