Breaking
Updated: ऑगस्ट 13, 2025
चांदीची चेन परत मागितल्याचा राग; मित्राकडून लोखंडी गजाने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी : मित्राला दिलेली चांदीची चेन परत मागितल्याच्या रागातून लोखंडी गजाने डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रंजित रामदास जावळे (वय ३२, व्यवसाय उस तोडी मजुरी, रा. खडकी, ता. वडवणी) हे १० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता खंडकी फाटा येथे होते. यावेळी त्यांचा मित्र नितीन राजाभाऊ जावळे (रा. देवळा, ता. वडवणी) याच्याकडे त्यांनी पूर्वी दिलेली चांदीची चेन परत मागितली.
यावर संतापलेल्या नितीनने “तुझी कशाची चेन” असे म्हणत शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि जवळ असलेल्या लोखंडी गजाने रंजितच्या डोक्यावर प्रहार करून त्याला जखमी केले. या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.