Breaking
Updated: जून 25, 2026
चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी – शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७) रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता.
स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे. सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी
चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने
तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नव्हते. या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेमुळे सुर्वेश्वर नगर परिसर आणि संपूर्ण परळी शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.