Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

माजलगावात बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र चोरीला

Updated: जानेवारी 6, 2026

By Vivek Sindhu

माजलगावात बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव: माजलगाव येथील नवीन बसस्थानकावर बसमध्ये चढताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. यामुळे बसस्थानक परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कौशल्या शंकर चोले (वय ५५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. खडकी, ता. वडवणी) या ५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास माजलगाव नवीन बसस्थानकावरून बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र तोडून चोरून नेले. या चोरीला गेलेल्या मंगळसूत्राची किंमत साधारण १३ हजार रुपये आहे.

याप्रकरणी कौशल्या चोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गुरखुदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts