Breaking
Updated: सप्टेंबर 11, 2025
विस्तार अधिकार्याची गळफास घेऊन आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी – बीड पंचायत समितीतील कृषी विभागामध्ये कार्यरत असणार्या एका विस्तार अधिकार्याने परळी शहरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवार (दि.११) रोजी सकाळी घडली आहे.
या घटनेने प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली. या अधिकार्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. विलास डोगरे (रा.ह.मु.शिवाजी नगर, परळी) हे बीड येथील पंचायत समितीतील कृषी विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आज सकाळी परळी शहरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. डोंगरे यांनी परळी पंचायत समिती अंतर्गत काही वर्षे काम केलेले आहे. ते तालुक्यातील खामगाव येथील होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, आई, पत्नी, भाऊ असा मोठा परिवार आहे.