Breaking
Updated: सप्टेंबर 20, 2025
जुन्या अपघातातील पैशांच्या वादातून शेतकऱ्यावर चाकू हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा : पारनेर येथील बांगर वस्तीवर जुन्या अपघातातील फिर्यादीस पैशांची मागणी करताना शेतकऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
सखाराम हनुमंत खाडे (वय ७५, रा. पारनेर, ता. पाटोदा) हे आपल्या गावी असताना अरुण अभिमान काळे (रा. पारधीवस्ती, पारनेर) याने जुन्या अपघाताच्या फिर्यादीस पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने आरोपीने चाकूने डाव्या खांद्यावर वार करून खाडे यांना जखमी केले तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह. उबाळे करीत आहेत.