Breaking
Updated: एप्रिल 16, 2026
कानडीमाळी परिसरातून ट्रॅक्टर-ट्रॉली लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: केज तालुक्यातील कानडीमाळी येथे घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सतीश सुदाम बनसोडे (वय ३८, रा. कानडीमाळी) यांनी केज पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १ ते ५ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. सतीश बनसोडे यांनी आपला निळ्या रंगाचा न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक MH 44 D 4796) आणि जगदंबा कंपनीची लाल-पिवळ्या रंगाची ट्रॉली घरासमोर पार्क केली होती.
चोरट्यांनी ट्रॅक्टरचे लॉक तोडून ट्रॉलीसह हा माल पळवून नेला. चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरची किंमत ४ लाख ५० हजार आणि ट्रॉलीची किंमत १ लाख २० हजार असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. केज पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सानप तपास करत आहेत.