Breaking
Updated: June 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupआष्टी – तालुक्यातील तलवार फाटा येथून टिप्परच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच बुधवार (दि.१८)रोजी कारवाई करत १,६२००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा सपाटा सुरू आहे.त्यात आष्टी तालुक्यातील तलवार फाटा येथून टिप्परच्या साहाय्याने अवैध वाळूची करताना रामहरी सयाजी आटपाले (वय ३२) रा. ब्रम्हगाव ता.आष्टी जि.बीड यांच्या आष्टी पोलिसांनी (दि.१८)रोजी कारवाई केली.यात एक टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच १४ एस ८१४९ अंदाजे किंमत १५,०००० रुपये व त्यामध्ये तीन ब्रास वाळू अंदाजे किंमत १२,००० रुपये असा एकूण १,६२००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत.