Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

समाजाचे प्रश्न समजावून घेवून त्यातून वाट काढीत काम करणे हीच खरी बाबा आढाव व पन्नालाल सुराणा यांना श्रध्दांजली ठरेल – अमर हबीब यांचे मत

Updated: डिसेंबर 17, 2025

By Vivek Sindhu

समाजाचे प्रश्न समजावून घेवून त्यातून वाट काढीत काम करणे हीच खरी बाबा आढाव व पन्नालाल सुराणा यांना श्रध्दांजली ठरेल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- समाजाचे प्रश्न समजावून घेवून त्यातून वाट काढीत काम करणे हीच खरी स्व. पन्नालालजी सुराणा आणि बाबा आढाव यांना श्रध्दांजली ठरणार असल्याचे मत अमर हबीब यांनी व्यक्त केले.
शहरातील समविचारी संघटनांचे वतीने येथील मनस्विनी परिसरात स्व. पन्नालाल सुराणा आणि बाबा आढ यांच्या श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ज्येष्ठ पत्रकार-लेखक अमर हबीब हे बोलत होते. या लोकसभेच्या अध्यक्षस्थानी मानवलोक चे अध्यक्ष अशोकराव देशमुख होते.
आपल्या श्रध्दांजलीपर मनोगतात अमर हबीब यांनी पन्नालाल ऊआणि बाबा आढाव यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. बाबा आढाव यांच्या स्मृती जागवतांना त्यांनी नामदेव ढसाळ आणि इतर दलित नेत्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा दलित पॅंथर चे जोमाने सुरू झाले तेव्हा दलित समाजामध्ये आत्मविश्र्वास निर्माण झाला होता. यावेळी सामाजिक वातावरण गढुळ होवू नये म्हणून बाबा आढाव यांनी या चळवळीत सवर्णांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले. यामुळे एक गाव एक पाणवठा या चळवळीत दलितेतर लोकांचा मोठा सहभाग राहिला. यापूर्वी कधीही समतेच्या लढाईत सवर्णांच्या सहभाग नव्हता, तो सहभाग बाबा आढाव यांच्या प्रयत्नामुळे सुरु झाला ही मोठी जमेची बाजू आहे.
बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, बापूसाहेब काळदाते आणि भाई वैद्य हे त्याकाळी पुण्यामध्ये एकत्र काम करायचे. यापैकी पन्नालाल सुराणा आणि बापूसाहेब काळदाते यांनी प
मानवी (प्रेम) विवाह केला. मानवी विवाह केल्यामुळे जाती विरहीत समाज निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले. आजही तरुणांना मानवी विवाह करण्यासाठी पुढे आले तर समाजातील जाती जातींमध्ये पसरणारे विष, तणाव मोठ्या प्रमाणावर कमी होईल असे सांगून हे दोन ही नेते अत्यंत धाडसी, अभ्यासू आणि प्रामाणिक पुणे काम करणारे, होते असे सांगितले.
सर्वसामान्य माणसांचे प्रश्न समजावून घेवून पन्नालाल सुराणा आणि बाबा आढाव यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी काम करीत राहिले. आपणही समाजाचे प्रश्न समजावून घेवून ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर तीच या दोघांनी ही खरी श्रद्धांजली ठरेल असे मत अमर हबीब यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
प्रारंभी या शोकसभेच्या संयोजिका प्रा. अरुंधती पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करुन दोन्ही मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण केली.
या सभेत लालासाहेब आगळे,
अशोक गुंजाळ, गोरख शेंद्रे, कालिदास आपेट, प्रा. शैला बरुरे,
डॉ. नरेंद्र काळे, डॉ. राजेश इंगोले, शिवाजी खोगरे, अनिता कांबळे, चंद्रकला देशमुख, अशोक पालवे, प्रदीप चव्हाण, गोविंद जोगदंड, नागनाथ पंदारे, राजू साळवे, प्रशांत मस्के, देशमुख मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली.
या शोकसभेत मानवलोक, मनस्विनी प्रकल्प, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मराठवाडा साहित्य परिषद, आंतर भारती, अ भा स. शिक्षण हक्क सभा,
स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया,
महात्मा फुले स्मारक समिती,
युवा आंदोलन संघटना,
छ. संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना
लिनेन्स क्लब, मराठवाडा जनताविकास परिषद, महामा फुले सेवा संघ, मराठवाडा शिक्षक संघ
हमाल संघटना यांनी आपला सहभाग नोंदवला होता.


Categories

Recent Posts