Breaking
Updated: ऑगस्ट 25, 2025
उधारीच्या मागितल्याच्या रागातून धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : किराणा दुकानातील केवळ नऊशे रुपयांच्या उधारीवरून सुरु झालेल्या वादाने हिंसक रूप धारण केले. दुकानदाराला धारधार शस्त्राने जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दादासाहेब बबनराव तळतकर (रा. बंगाली पिंपळा, ता. गेवराई) हे सकाळी 8.30 वाजता आपल्या किराणा दुकानात असताना सिद्धार्थ बंडु माने हा तेथे आला. त्याने पाण्याची बाटली मागितली असता फिर्यादी यांनी त्याला सांगितले की, “तुझ्या चुलत्याकडे माझी 900 रुपयांची उधारी आहे, ती आधी चुकता कर.” या कारणावरून सिद्धार्थ माने संतापला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून दुकानाबाहेर खेचले व चापट मारली.
इतक्यात त्याचा चुलता सुधीर भगवान माने हा हातात धारदार लोखंडी कत्ती घेऊन आला. त्याने “आमची 900 रुपयांसाठी इज्जत घेतोस का?” असे म्हणत फिर्यादीच्या मानेवर व कानामागे कत्तीने वार करून गंभीर दुखापत केली. या वेळी फिर्यादीचा भाऊ गणेश याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही उजव्या हाताच्या बोटाला कत्तीचा वार बसला.
यानंतर भगवान माने याने लाकडी काठीने फिर्यादीच्या पाठीवर मारहाण केली, तर मधुकर उर्फ बंडु माने हा लोखंडी कोयता घेऊन आला आणि शिवीगाळ करू लागला. गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून फिर्यादी व त्याचा भाऊ यांना सोडवले. जखमींना तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी सिद्धार्थ बंडु माने, सुधीर भगवान माने, भगवान बापुराव माने आणि मधुकर उर्फ बंडु माने (सर्व रा. बंगाली पिंपळा) यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुहील तपास सुरू आहे.