Breaking
Updated: June 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज तालुक्यातील होळ येथील घटना
केज : अंबाजोगाई येथून केजच्या दिशेने चाललेल्या ट्रॅव्हल्स व दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) रात्री होळ (ता.केज ) येथे घडली आहे.
दत्तात्रय बबन फुगारे (वय ३५ वर्ष) रा. होळ (ता. केज), संतोष भडके (वय ३२ वर्ष) रा. मोरवड ता. रेणापूर (जि.लातूर) असे मयतांची नावे आहेत. संतोष भडके हा दत्तात्रय फुगारे यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास असून, हे दोघे बुधवारी रात्री दुचाकी क्र. एम.एच.४४ एन ८४१८ वर बसून हॉटेलवर जेवण्यासाठी गेले होते. जेवण करुन परत शेतात येताना अंबाजोगाई कडून केजच्या दिशेने चाललेली ट्रॅव्हल्स क्र. एम.एच. २४ ए टी ९९०० याने दुचाकीला जोराची धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाले. याप्रकरणी अद्याप पोलिसात नोंद नाही. या घटनेने होळ येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.