Breaking

सुट्ट्यात गावी गेलेल्या वकिलाच्या घरात चोरी

Updated: जून 4, 2026

By Vivek Sindhu

सुट्ट्यात गावी गेलेल्या वकिलाच्या घरात चोरी !

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज:- सामान्य आणि पापभीरू माणसे देवावर श्रद्धा ठेवतात तसेच पाप पुण्य याच्या नैतिक विचार करून आपले वर्तन चांगले ठेवतात. मात्र नैतिकता विसरून चोऱ्या-चपाट्या, पाकिटमारी करणारे चोर, डाकू आणि नैतिकता वेशीला टांगणाऱ्या विषयी 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, “सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव !” अशीच अवस्था केजमध्ये चोरट्यांनी चक्क चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह चांदीच्या देवाची चोरी केली आणि तीही चक्क एका वकिलाच्या घरी !

ॲड. अभिषेक अंकुश धपाटे हे केज येथील न्यायालयात वकिलीचा व्यायसाय करतात तर त्यांच्या पत्नी या जयभवानी आणि शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्याने केज येथे राहत असलेले वकील आणि त्यांची शिक्षिका पत्नी हे त्यांच्या गावी गेल्याची संधी एका चोरट्याने साधून वकिलांचे घर फोडून चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरून नेली. मात्र चोरी करीत असताना चोर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

केज येथील धारूर चौकात राहत असलेले ॲड. अभिषेक अंकुश धपाटे हे केज न्यायालयात वकिली करतात तर त्यांची पत्नी जयभवानी कन्या शाळेत सहशिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य करतात. न्यायालय आणि शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्याने दि. १५ मे रोजी धपाटे दांपत्य हे, धारूर चौक, केज येथील त्यांच्या घराला कुलूप लावून घर व्यवस्थित बंद करून त्यांच्या मूळ गावी भाटुंबा येथे गेले होते. पंधरा दिवसा नंतर ते दि. २ जून रोजी पुन्हा केज येथे आले असता त्यांना त्यांच्या घराचे गेटचे कुलुप तुटलेले दिसले व घराचा दरवाजा उघडा दिसला. म्हणून त्यांनी घरात जावुन पाहीले असता घरातील कपाट उघडे होते आणि कपाटातील तीन भाराचे चांदीचे दोन करंडे, चार भारच्या चांदीच्या दोन आरत्या, पाच भाराचे चांदीचे दोन जोड जोडवे आणि दोन भार वजनाची चांदीचे विघ्नहर्ता श्रीगणेशाची मूर्ती यासह रोख २२ हजार रु. चोरी झाली असल्याचे आढळून आहे.

ॲड.अभिषेक धपाटे यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३५०/२०२६ भा. न्या. सं. ३०३(३)आहे.

या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल विष्णू नागरगोजे हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts