Breaking

ना.पंकजा मुंडेंचा अंबाजोगाईत जनता दरबार ; जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण

Updated: जून 4, 2026

By Vivek Sindhu

ना.पंकजा मुंडेंचा अंबाजोगाईत जनता दरबार ; जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई – राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी आज शहरातील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्यांचा जागेवर निपटारा केला.

ना. पंकजा मुंडे यांचे आज दुपारी शहरात आगमन झाले. विविध ठिकाणी भेटी घेतल्यानंतर त्यांनी प्रशांतनगर भागात नव्यानेच सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला. त्यांना भेटून समस्या मांडण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. आलेल्या प्रत्येकांना भेटत, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांच्या कामाचे पत्र असतील, फोन असतील किंवा वैयक्तिक काम असेल ते त्यांनी जागेवरच सोडविले.

कामे घेऊन येणारांची दरवेळेस होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भेटीचे शिस्तबद्ध नियोजन केले आहे. प्रचंड गर्दीमुळे नियोजन कोलमडते, हा अनुभव पाहून आलेल्या प्रत्येकाचे काम मार्गी लागले जावे, त्यांचे प्रश्न ऐकले जावेत यासाठी अंबाजोगाईत जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.परळी मतदारसंघाचा काही भाग अंबाजोगाई तालुक्यात येत असल्याने आणि केज तालुकासुध्दा जवळ असल्याने दोन्ही भागातील जनतेची सोय याठिकाणी झाली आहे. जनता दरबार संकल्पनेचे नागरिकांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.

अंबाजोगाईकडे जाताना रस्त्यात वरवटी येथे ॲड अशोक मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेला भेट देऊन ना. पंकजाताईंनी येथील विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांची पाहणी करून कौतुक केले. आधुनिक पध्दतीच्या गोकाष्ठ सयंत्राचे उदघाटन त्यांनी याप्रसंगी केले.

ना.पंकजाताईंनी दुपारी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.भाजपचे प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी देखील ना.पंकजाताईंनी भेट दिली. रामभाऊ यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू शकल्या नसल्याने आजच्या दौऱ्यात त्यांच्या घरी जावून नवदामप्त्यांना शुभाशीर्वाद दिले.

शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बालासाहेब दोडतले यांच्या मातोश्री कमलबाई तसेच पुरूषोत्तम भन्साळी यांच्या मातोश्री शकुंतलाबाई यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज शहरात आल्यानंतर या दोन्ही परिवाराच्या घरी जाऊन ना.पंकजा मुंडें त्यांचे सांत्वन केले.


Categories

Recent Posts